तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत इंदुरशाळेला 36 पदक मिळाले.

Fri 04-Oct-2024,09:44 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले 

 हिंगोली

 

हिंगोली वसमत तालुक्यातील इंदुरा शाळेला

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत शाळेने 36 पदक मिळवून आपला ठसा उमटवला आहे.वसमत तालुक्यातील सी बी एस ई बोर्डाची मान्यता असलेल्या एकमेव इंदूरा इंग्लिश स्कूलने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रीडा स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.तालुकास्तर व जिल्हा स्तर मिळून शाळेने 16 सुवर्ण पदक, 15 रौप्य पदक व पाच कांस्य पदक मिळवले आहेत.शाळेतील किमान 105 विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेतला .शाळेचे दोन विद्यार्थी अनुक्रमे ऋषभ कोठे व सुजित हलदर हे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाले आहे. नैसर्गिक वातावरण सुसज्य क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य आणि अनुभवी प्रशिक्षित क्रीडा शिक्षक यामुळे क्रीडा स्पर्धेत शाळा उज्वल यश संपादन करत आहे .सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक श्री निसार सर यांचे संस्थेचे सचिव श्री कैलास पानखडे सर , उपप्राचार्य खाकरे सर यांनी अभिनंदन केले.

 शाळेच्या यशाबद्दल सचिव श्री पानखडे सर यांनी समाधान व्यक्त केले आहे.